स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रँकेट:सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा:विदेश तरूणीची सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रँकेट:सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा:विदेश तरूणीची सुटका

पुणे - शहरातील अापटे रस्त्यावरील पंचतारांकित रॅमी ग्रॅंड हाॅटेल मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेले सेक्स रॅकेट सामाजिक सुरक्षा विभागाच्या छाप्यामुळे उघडकीस अाले अाहे. पाेलीसांनी 27 वर्षीय उजबेकिस्तान देशातील परदेशी तरुणीची वेश्याव्यवसायातून सुटका केली असून तिला हडपसर येथील सुधारगृहात ठेवण्यात अाले अाहे.
याप्रकरणी दाेनजणां विराेधात पाेलीसांनी डेक्कन पाेलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांनी दिली अाहे. संबंधित हाॅटेल मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली परदेशी महिलेस पैशांचे अमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली हाेती

Comments