बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट : दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी
बीड : शेतातील उभी असलेली पिके पावसाअभावी माना टाकू लागली आहेत. दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांसमोर उभे आहे. मुक्या जनावरांचे पाण्यासाठी, चार्यासाठी हाल होत आहेत. ग्रामीण भागात माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. बीड आणि शिरुर तालुक्यात पावसाची टक्केवारी खुपच कमी असल्याने हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे युवानेते तथा जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेत्रत्वखाली राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, माजी जि.प.सदस्य मदन जाधव, शिरुरचे नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर, तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, माजी उपनगराध्यक्ष बाबुराव झीरपे, नगर पंचायत गटनेते नसीर शेख, आनंद जावळे, पं.स. सदस्य माऊली सानप, रामदास हांगे,सचिन शेळके, जीवन जाेगदंड, महादेव उबाळे ,पं.स.सदस्य मोहन देवकते, अनिल जाधव, उत्तरेश्वर सोनवणे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतातील उभे पिके करपली आहेत. यावर प्रशासनाने आणि शासनाने तातडीने विचार करुन ही दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावेत आणि शेतकर्यांना तातडीची मदत द्यावी नसता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतकर्यांच्या, मजुरांच्या हाताला काम नसल्याने तात्काळ कामे देण्यात यावीत, महूसल प्रशासनाने पिकांचे पंचनामे करुन हेक्टरी एक लाख रुपयाची मदत शेतकर्यांना द्यावी, माणसांचे पाण्यासाठी, जनावरांचे पाणी चार्यासाठी हाल होत असून त्यावर तातडीने उपाय योजना करण्यात यावी, मागील वर्षी शेतकर्यांना आलेले दुष्काळाचे अनुदान तात्काळ वाटप करावे, ग्रामीण भागात पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावे, जनावरांना चार्याची, पाण्याची सोय तात्काळ करण्यात यावी. कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा आदी मागण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी विकास माने ,बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांना निवेदन देण्यात आले .
शेतकर्यांच्या व्यथा समजून घ्या नसता तीव्र आंदोलन- संदीप क्षीरसागर
शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट आहे. गेल्या चार वर्षातील दुष्काळामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले. आता पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांसमोर दुष्काळाचे आस्मानी संकट उभे असून शासन आणि प्रशासनाने शेतकर्यांच्या व्यथा समाजून घ्याव्यात आणि बीड आणि शिरुर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा नसता राष्ट्रवादी कॉाग्रेस पक्षाच्या वतीने शेतकर्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे.

Comments
Post a Comment