सौरव गांगुलीची होणार बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड?

सौरव गांगुलीची होणार बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड?


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसाआयच्या अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयानं लोढा समितीच्या काही शिफारशी बाजूला करत नव्या घटनेतील मसुद्यांना मंजूरी दिली आहे.सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.दरम्यान, गांगुली सध्या बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्ष आहे. जर त्याला बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी विराजमान व्हायचं असेल तर त्याला बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

Comments