१५ आॅगस्टनंतर मराठा समाजाचे चूल बंद आंदोलन
मुंबई : गेल्या महिन्याभरापासून आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलने आणि मोर्चें काढण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आता मराठा मोर्चा समितीने आंदोलनाबाबत वेगळा विचार केला आहे. यापुढे आंदोलन, मोर्चे नाही तर साखळी उपोषण केले जाणार आहे. आरक्षणप्रश्नी समाज आता रस्त्यावर उतरणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. १५ आॅगस्टनंतर चूल बंद आंदोलन तसेच एक वेळ अन्नत्याग केला जाणार असल्याची माहितीही समितीने दिली आहे.

Comments
Post a Comment