दोन गटात रक्तरंजित राडा:जखमीना जिल्हारूग्नालयात उपचारासाठी दाखल

दोन गटात रक्तरंजित राडा:जखमीना जिल्हारूग्नालयात उपचारासाठी दाखल

बीड : कंदुरीच्या कारणावरुन दोन गट समोरासमोर भिडल्याने झालेल्या हाणामारीमध्ये दहा जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज दुपारी चौसाळा (ता.बीड) येथे घडली. रक्तरंजित राड्यानंतर दोन्ही गटातील जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता याठिकाणीही दोन्ही गटाकडील नातेवाईक पुन्हा समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान जखमींपैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असुन दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Comments