सीसीटीव्ही फुटेजमुळे वाळूज एमआयडीसी तोडफोड प्रकरणाच्या तपासाला वेग
औरंगाबाद: वाळूज औद्योगिक वसाहती मध्ये जो काही हिंसाचार झाला. त्याचे काही सीसीटीव्ही फूटेज आता समोर येत आहेत. यात हिंसाचार करणारे ठरवून आले होते असं स्पष्ट दिसून येत आहे. ओळख पटू नये म्हणून हल्लेखोरांनी तोंडाला कपडे बांधले होते. व्हीडिओ मध्ये हल्लेखोर कसे येतात, कशा पद्धतीने जाळपोळ करतात हे स्पष्ट दिसताय, तोडफोड करतानाचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. पोलीस आता या सीसीटीव्हीद्वारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.हिंसाचारात जवळपास ७० ते ८० कोटींचे नुकसान
दरम्यान, या वेळी झालेल्या झालेल्या हिंसाचारात जवळपास ७० ते ८० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकूण जवळपास ८० कंपन्यांमध्ये तोडफोड झालीये.. आतापर्यंत त्यापैकी केवळ ५५ कंपन्यांच्या नुकसानीने पंचनामे झालेत.. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढून १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी ४५ लोकांना ताब्यात घेतलंय.. तर ३७ लोकांना अटक दाखवण्यात आली आहे.
३७ जणांना अटक
दरम्यान, औरंगाबादच्या वाळूज तोडफोड प्रकरणात मराठेतर दंगलखोर असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत या तोडफोड प्रकरणात ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात १३ जण हे मराठा समाजाचे नसून, इतर समाजाचे असल्याचं पुढं आलंय. या लोकांनीसुद्धा तोडफोड केल्याचं दिसतंय.

Comments
Post a Comment