पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक संकटात, बळीराजा चिंताग्रस्त


पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक संकटात, बळीराजा चिंताग्रस्त

लातूर प्रतिनीधी - सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन करणारा जिल्हा अशी लातूरची ओळख आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने येथील सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत यावर्षी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पेरलेली सोयाबीन उगवलीच नाही; कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतला गळफास 
जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाला. ज्यामुळे यंदा खरीप उत्पादन चांगले होणार अशी बळीराजाला अपेक्षा होती. मात्र, जून महिन्याच्या नंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारली आणि बळीराजाच्या आशा धुळीस मिळण्याची चिन्हे निर्माण झाली.
आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४० टक्के पाऊस झाला आहे. जो खरीप पिकासाठी पुरेसा नाही. परिणामी हलक्या जमिनीवरील सोयाबीन पीक आता पिवळे पडून, वाळून चालेले आहे. मात्र, चांगल्या जमिनीतील सोयाबीनलाही सध्या पावसाची अत्यंत गरज आहे.
 सोयाबीन अनुदानाचा गुंता सुटला, ६ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभवातावरण बदलाचा परिणाम खरीप पिकांच्या वाढीवर होत असून, पिकांवर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे ३२४३३५ हेक्टर ऐकूण क्षेत्र आहे. मात्र, प्रत्यक्षात सोयाबीन पेरणी ३८१०९५ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. सध्या फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन पिकासह उडीद व मुग ही पिके देखील कोमेजून जाता आहेत. शेतातील उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. पावसासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले असून, पाऊस येत नसल्याने पिके वाचवण्यासाठी बळीराजा धडपड करत आहे.
निलंगा तालुक्यात यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने पेरणी केली होती. मात्र, नंतर पाऊस झाला नाही त्यामुळे हलक्या जमिनीवरचे पीक पूर्णतः वाया गेल्यात जमा आहे. बियाणे, खत, तृणनाशके याचा हजारोचा खर्च व योग्य वेळेवर पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. येत्या आठवडाभरात समाधान कारक पाऊस पडला तरी सोयाबीन, उडीद व मूग याचे होणारे उत्पादन, खर्चाच्या झालेल्या तुलनेत निघण्यासारखे नाही. त्यात गतवर्षीच्या पीकविमा रकमेत सरकारकडून बळीराजाची झालेली थट्टा पाहता यंदा बहुतेक शेतकरी वर्ग पिकविमा भरण्यात उदासिन होता.

Comments